Old Pension : राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने इपीएस ९५ पेन्शनधारकांचा आज (दि. १४) ऑगस्ट रोजी श्रीरामपूरात राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या निर्देशानुसार व पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांच्या नेतृत्वाखाली पेन्शनधारकांचा निषेध मोर्चा निघणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष राधाकृष्ण धुमाळ यांनी दिली.
पेन्शनधारकांच्या पेन्शनवाढ आदी समस्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांनी नवी दिल्ली येथे श्रम मंत्री यांच्याशी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ४ ऑगस्ट रोजी पोलिसांनी अटक केली.

तसेच ३ ऑगस्ट रोजी संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रम मंत्री यांनी नकारात्मक भूमिका घेतली. या दोन्ही घटनेचा निषेध करण्यासाठी व याबाबत पंतप्रधान यांना प्रांताधिकारी श्रीरामपूर यांच्यामार्फत निवेदन देण्यासाठी शांततामय मार्गाने निषेध मोर्चा आयोजित केला आहे.
त्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील पेन्शनधारकांनी १४ ऑगस्ट रोजी जास्तीत जास्त संख्येने दुपारी एक वाजता टिळक वाचनालयासमोर जमावे. तेथून पायी वारीने प्रांताधिकारी श्रीरामपूर कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात येईल.
यावेळी पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर, जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष भगवंत वाळके, महिला आघाडी अध्यक्षा आशाताई शिंदे, नेवासा तालुकाध्यक्ष बापूराव बहिरट,
राहाता तालुकाध्यक्ष सुकदेव आहेर, संगमनेर तालुकाध्यक्ष अशोकराव देशमुख, दशरथ पवार, सुलेमान शेख आदींचे मार्गदर्शन होईल. त्यामुळे सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष राधाकृष्ण धुमाळ यांनी केले आहे.