Ahmednagar News : शिवाजी कर्डिले यांना तडीपार करा; ॲड. अभिषेक भगत यांच्यावरील अँट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करा

Ahmednagarlive24 office
Updated:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कार्डिले व अक्षय कर्डिले यांच्यावर ३५६ / ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले असतानाही कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी जाणूनबुजून विलंब करत गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे आरोपी शिवाजी कर्डिले व इतरांना वेळ मिळाल्याने त्यांनी या आदेशास न्यायालयातून स्थगिती मिळवली.

या प्रकरणातील फिर्यादी अॅड. अभिषेक भगत यांच्यावर दाखल झालेला अॅट्रोसिटीचा खोटा गुन्हा मागे घेऊन त्यांच्या जीवितास धोका असल्याने त्यांना त्वरित पोलीस संरक्षण द्यावे, या मागण्यांचे निवेदन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षिय शिष्टमंडळाने पोलीस उपाधिक्षक अनिल कातकडे यांच्याकडे किली.

८ दिवसात या मागण्यांवर कार्यवाही झाली नाहीतर पोलीस अधिक्षक कार्यालयात आमरण आपण करू, असा इशारा तनपुरे यांनी दिला, आ.प्राजक्त तनपुरे यानी गुरुवारी या प्रकरणाचे तपास अधिकारी व पोलीस उपाधिक्षक अनिल काकडे यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी शिवसेनेचे प्रमुख शशिकांत गाडे, जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ, संदेश कारले, शरद झोडगे, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, रोहिस कर्डिले, गिरीश जाधव, केशव बेरड, संग्राम कोतकर, संजय झिजे, अमोल भांबरकर, बाळासाहेब बोराटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षकांनी कर्डिले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास का विलंब केला, तसेच तोफखाना पोलिसांनी कोणतीही शाहनिशा न करता अँड. अभिषेक भगत यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल कसा केला, या मुद्यांवर आ. तनपुरे, अभिषेक कळमकर, बाबासाहेब हराळ, दिलीप सातपुते यांनी पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी या प्रकरणाबाबत तातडीने अहवाल मागून घेतो व पूर्ण चौकशी करतो असे आश्वासन कातकाडे यांनी शिष्ठमंडळास दिले.

दरम्यान प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आ. प्राजक्त तनपुरे म्हणाले, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात सर्वांनी पक्षविरहीत भूमिका घेतली आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. अँड. भगत व कर्डिले यांच्यात अनेक वर्षांपासून वाद आहेत. त्यांची बुऱ्हाणनगर परिसरात असलेल्या वडिलोपार्जीत जमिनी बळकावण्यासाठी कर्डिले त्यांना दमदाटी करत आहे. जाहीरपणे दहशत करत आहेत.

याबाबाबत भगत यांनी न्यायालयात खाजगी फिर्याद दिल्यावर न्यायालयाने कोतवाली पोलिसांना कर्डिले व इतरांवरोधात गुन्हा दाखल करण्याचे ८ सप्टेंबर रोजी निर्देश दिली होते. मात्र पोलीस अधिकांनी जाणूनबुजून विलंब करत १२ तारखेपर्यंत कोणताही गुन्हा दाखल न झाल्याने समोरच्या व्यक्तींनी या आदेशास स्थगिती मिळवली आहे.

कोटाने आदेश देवूनही कर्डिले यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही, मात्र अभिषेक भगत यांच्यावर तातडीने अँट्रॉसिटीचा गुन्हा कसा काय दाखल होतो. या दोन विरोधाभास असल्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील पोलीस यंत्रणा ही सरकारी आहे का भारतीय जनता पार्टीची यंत्रणा आहे.

भाजपच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार पोलीस काम करत असल्याने भाजपच्या नेत्यांच्या हातातील बाहुले पोलीस झाले आहेत. भाजपच्या पुढाऱ्यांना पोलीस प्रशासन पाठीशी घालत असल्याने हे पोलीस प्रशासन भाजप चालवत आहे, असा कारभार आम्ही खपवून घेणार नाही. जर तातडीने या सर्व घटनांबवत पोलीस अधिक्षकांनी कडक कार्यवाही केली नाहीतर सर्व पदाधिकारी उपोषण करू, असा इशारा दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe