अस्वच्छता पसरविणाऱ्यावर होणार दंडात्मक कारवाई

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा अभियानात यश संपादन करण्यासाठी मनपाने पुढाकार घेत आक्रमकपणे या मोहिमेला पुढे घेऊन जाण्याचा पण मनपाने घेतला आहे.

स्वच्छतेचा पुढाकार स्वीकारणारी मनपा यापुढे सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर तसेच अस्वच्छता पसरविणाऱ्यावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करणार आहे.

मनपाने ठिकठिकाणी सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला असून आता रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर सिसिटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी विभागप्रमुखांच्या साप्ताहिक आढावा बैठकीत दिले.

आयुक्त मायकलवार म्हणाले, शहरातील दैनंदिन कचरा उचलला जात आहे. परंतु ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण होत नसल्याने त्यावर प्रक्रिया करणे व विल्हेवाट लावणे अवघड होत आहे.

त्यादृष्टीने उपाययोजना सुरु केल्या आहेत. यासाठी मनपा कर्मचाऱ्यांना घरगुती कंपोस्ट खत प्रकल्प निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच नगर शहरातील जनतेला दिवसाआड सुका व ओला कचऱ्याचे नियोजन करून जनतेमध्ये जनजागृती करावी. यामुळे ओला व सुका कचरा विलगीकरण होण्यास मदत होईल. नागरिकांनी या अभियानामध्ये भाग घेवून नगर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment