जनावरांची कत्तल होत असल्याच्या संशयावरून महिलांना धक्काबुक्की, दोन तरुणांची यथेच्छ धुलाई

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  राहुरी शहरातील खाटीक गल्ली येथे एका घरात जनावरांची कत्तल होत आहे. असे सांगून प्रसाद गाडे व आबा नाईकवाडे हे दोन तरूण अझीम सय्यद याच्या घरात जबरदस्तीने घूसले.

आणि महिलांना धक्का बूक्की करत पैशाची मागणी केली. ही घटना दिनांक १ ऑक्टोबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली. आरोपी प्रसाद मधुकर गाडे व आबा नाईकवाडे हे दोन तरूण राहुरी पोलिस ठाण्यात आले आणि शहरातील खाटीक गल्ली येथे एका घरात जनावरांची अमानुषपणे कत्तल होत आहे.

अशी माहीती पोलिसांना दिली. त्यानंतर ते दोघे खाटीक गल्ली येथील अझीम रज्जाक सय्यद याच्या घरात अनाधिकृतपणे घुसले. यावेळी सय्यद यांच्या घरातील महिला नमाज पठण करत होत्या. त्यावेळी त्यांनी महिलांना धक्का बूक्की करून तूमच्या घरात जनावरांची कत्तल होते. असे म्हणून पैशाची मागणी केली.

तसेच त्यांच्या अंगावरील दागीने ओरबडण्याचा प्रयत्न केला. अशी माहिती सय्यद याच्या घरातील महिलांनी दिली. यावेळी त्या महिलांनी आरडाओरड केली असता परिसरातील शेकडो तरूण घटनास्थळी जमा झाले. यावेळी जमलेल्या तरूणांनी प्रसाद गाडे व आबा नाईकवाडे यांची यथेच्छ धुलाई करत त्यांना पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले.

सदर तरूण आम्हाला वारंवार पैशाची मागणी करून त्रास देतात. जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत आम्ही पोलिस ठाण्यातून बाहेर जाणार नाही. असा पवित्रा महिलांनी घेतला होता. यावेळी पोलिस ठाण्याच्या आवारात तरूणांसह अनेक महिलांनी मोठी गर्दी केली होती.

याबाबत पोलिसांत गाडे व नाईकवाडे यांच्यावर अनाधिकृत पणे घरात घूसल्याचा तसेच सय्यद याच्यावर गोहत्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe