नगरमध्ये ‘राडा’ स्टाईल फोफावतेय ! किरकोळ कारणावरून गटतट एकमेकांना मारतायत, ना गुन्हा ना कारवाई.. सगळंच सिनेस्टाइल

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरासह उपनगरामधील वातावरण कलुषित व्हायायला लागलं आहे. सहनशीलता राहिलीच नाही की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. किरकोळ कारणातून भांडणे करायची त्यानंतर लगेच मित्रांना बोलावून घ्यायचे व लगेच हाणामाऱ्या सुरु करायच्या असे वातावरण सध्या दिसत आहे.

विशेष म्हणजे याना ना कसली भीती ना कसला धाक. यावर ना गुन्हे दाखल होतात तर ना यावर कारवाई होत. त्यामुळे अगदी जस आपण सिनेमात पाहतो तस वातावरण तयार झालं आहे का? असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडत आहे.

 गुंडगिरी डोके काढतेय वर ?

नगर शहरासह विविध उपनगरात गुन्हेगारी बोकाळताना दिसत आहे. सावेडी उपनगरात दोन गटांत वाद होऊन खून झाल्याच्या एकापाठोपाठ एक अशा दोन घटना घडल्या. किरकोळ कारणातून दोन गटांत भांडणे होण्याचे प्रकार वाढले आहेत.

नुकताच सर्जेपुरा परिसरात देखील असाच भांडणाचा थरार घडला आहे. ही भांडणे रस्त्यावर वाहनाचा कट लागल्यावरून किंवा इतर किरकोळ कारणातून होतात. त्याचे पर्यावसन भांडणात होते. तुझ्यापेक्षा मी मोठा कसा आहे, हे दाखविण्यासाठी मित्रांना बोलावून मग राडा केला जातो. यामुळे सध्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र दहशतीचे वातावरण आहे.

वाहतूक खोळंबा,नागरिकांत भीती..’दबंग’ कारवाईची गरज

भांडण करणारे स्थानिक लोक असतात. त्यामुळे त्यांचे मित्रही ताबडतोब तेथे येतात. मग बघ्यांचीही गर्दी होते. जोपर्यंत वाद मिटत नाही, तोपर्यंत प्रवासी कोंडीत अडकून पडतात. असाच प्रकार नुकताच नगर-मनमाडरोडवरील प्रेमदान चौक परिसरात घडला होता. मोठा जमाव व राडा झाला होता.

यामुळे बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती. सध्या यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे या लोकांवर कारवाईची गरज निर्माण निर्माण झाली आहे. एखादा ‘दबंग’ अधिकारी निर्माण होऊन या गुंडगिरीवर धडाकेबाज कारवाई करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

राजकीय वरदहस्त ?

बऱ्याचदा हे राडा घालणारे मित्र अंतिम एखाद्या बड्या नेत्याला फोन लावतात. त्यामुळे समोरचा गटही त्याच लेव्हलच्या पुढाऱ्याला फोन करतो. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यावर भर दिला जातो. त्यामुळे राडा होऊनही गुन्हा दाखल होत नाही अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe