अहमदनगरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा ! ‘त्या’ पाच जणांना पकडले

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : अहमदनगर एमआयडीसी परीसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी सोमवारी (दि. २५) मध्यरात्री छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ५ जणांना १ लाख ४१ हजारांच्या मुददेमालासह पकडले आहे.

सनफार्मा चौक ते निंबळक जाणारे रोडवर ही कारवाई करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाई केलेल्यामध्ये हरीभाऊ बसवेश्वर मुक्तापुरे (वय ३१, रा. भुसणी ता. औसा, जि. लातुर), अमोल महादेव चौधरी (वय २१, रा. नागापुर ता. नगर),

जुबेर शौकत पठाण (वय २४, रा. नागापुर), सुनिल चंद्रकांत रणदिवे (वय ३२, रा. नागापुर, ता.नगर), विशाल विष्णु शिंदे (वय २८, रा नागापुर, ता.नगर) यांचा समावेश आहे.

एमआयडीसीमध्ये सनफार्मा चौक ते निंबळककडे जाणाऱ्या रोडवर ही कारवाई करण्यात आली. काही इसम गोलाकार बसुन तिरट नावाचा जुगार खेळतांना मिळुन आले. त्यांना या पथकाने पकडले.

त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे १ लाख ४१ हजार २१० रुपये किमतीचा मुदद्देमाल व तिरट खेळाचे साहित्य मिळुन आले आहे.

त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स.पो.नि. राजेंद्र सानपयांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर,

पो. हे.कॉ. साबीर शेख, पो.हे.कॉ. देशमुख, शिंदे, पो.कॉ. किशोर जाधव, धुमाळ यांचे पथकाने केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe