Ahmednagar News : सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस, तापमानाचा पारा १० अंशावर

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारनंतर पुन्हा एकदा काल बुधवारी (१० जानेवारी) अवकाळी पावसाने हजेरी लावली. सलग दोन दिवस झालेल्या पावसाने शेतकऱ्यांसह चाकरमान्यांची चांगलीच भंबेरी उडाली.

२४ तासांत जिल्ह्यात १.१ मिलिमीटर पाऊस झाला. पावसासोबत थंड हवा असल्याने हुडहुडी भरली आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद मंगळवारी (९ जानेवारी) झाली. शहराचे तापमान १० अंश सेल्सिअस इतके खाली आले होते.

मंगळवारी व बुधवारी शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिवसभर ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस सुरू होता. थंडी देखील वाढलेली होती. शहरातील अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचले होते.

 किती झाले नुकसान?

शहरासह जिल्ह्यात ६ जानेवारीला झालेल्या अवकाळी पावसाने नगर तालुक्यातील घोसपुरी व खंडाळा या भागात २३ हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी व तूर पिकाचे नुकसान झाले. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसानेही २१ हजार हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त नुकसान झाले होते.

कोठे किती झाला पाऊस (मागील २४ तासांत आकडेवारी मिलिमीटरमध्ये )

श्रीरामपूर १.५०, कोपरगाव १.०, अकोले ०.२, संगमनेर १.३, राहुरी ०.८, नेवासे १.४, पाथर्डी २.६, शेवगाव ०८, जामखेड ०.२, कर्जत ०.२, श्रीगोंद २.८, पारनेर-०.७, नगर ०.३

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe