Ahmednagar News राणीताईलंके यांनी सांगितला शिवस्वराज्य यात्रा काढण्यामागील उद्देश

Ahmednagarlive24 office
Updated:
Ahmednagar News

Ahmednagar News : छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीभेद न करता अठरा-पगड जातींच्या मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली व अखंड महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थानचे आराध्य दैवत बनले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार आणि विचार अंगीकृत करणे, भावी पिढी श्री छत्रपती शिवाजी महाराजांसारखी घडवणे ही काळाची गरज आहे. असे मत राणीताई लंके यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होऊन ३५० वर्षे झाली. त्यांचे अर्थशास्त्रीय विचार, पारदर्शी प्रशासन, शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ, दुरदृष्टीपणा व तरूणाईला सदैव प्रेरणा देणारे विचार हे प्रत्येक घराघरात पोहचण्यासाठी व मनात रूजवण्यासाठी शिवराज्य यात्रा काढली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करताना जनतेला केंद्रस्थानी मानले होते. जनतेच्या पैशांचा विचार करणारा आणि कष्टांची जाणीव असणारा हा महान राजा होता. पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, उद्योगधंद्याला प्रोत्साहन देणे यावर महाराजांचा भर होता.

त्यामुळे केवळ ३६,००० रुपयातून सुरू केलेले स्वराज्य महाराजांच्या वयाच्या ५० व्या वर्षी तीन लाख ४२ हजार कोटी रुपयांचा वार्षिक उत्पन्न देणारे आर्थिकरित्या अत्यंत सक्षम असं राष्ट्र म्हणून उदयाला आलं.

व्यापार व उद्योग वाढवण्यासाठी राजांनी त्या काळात पोर्तुगीज आणि इंग्रजा सारख्या मातब्बर व्यापाऱ्यांकडून देखील जकात आकारली, महाराजांच्या या धोरणामुळे कोकणातील उत्पादनांना फ्रेंच, इंग्रज, डच या व्यापाऱ्यांना चांगला भाव देणे भाग पडले.

राजांचे पारदर्शी प्रशासन, शेतकऱ्यांचा जाणता राजा, तरुणाईला सदैव प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज राजे, बारा बलुतेदार एकत्र करून अठरापगड जातींना संरक्षण देऊन कर्तबगारी नुसार सन्मान दिला. छत्रपतींचे हे विचार प्रत्येक घराघरात पोहचण्यासाठी व मनात रूजवण्यासाठी शिवराज्य यात्रा असल्याचे लंके यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe