Ahmednagar News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मराठा नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या रस्ता रोकोच्या आवाहनानुसार सकल मराठा समाजातर्फे नगर सोलापूर रस्त्यावरील श्रीगोंदा तालुक्यातील कोंभळी फाटा तसेच नगर दौंड रस्त्यावरील पारगाव फाटा या ठिकाणी शनिवारी दि.२४ रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. मात्र, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवे आहे, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.
तसेच सगे सोयरेची मागणी मान्य केली जात नाही तो पर्यंत दररोज दोन तास रास्ता रोको करण्याचे कार्यकत्यांना आदेश दिले होते.
त्या नुसार श्रीगोंदा सकल मराठा समाजातर्फे नगर सोलापूर रस्त्यावरील श्रीगोंदा तालुक्यातील कोंभळी फाटा तसेच नगर दौंड रस्त्यावरील पारगाव फाटा या ठिकाणी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भारती इंगवले, सुदाम कुटे, सोनाली शिंदे, वंदना भापकर,
शोभा काळे, अतुल वाजे, सागर जंगले, सागर औटी, संजय सावंत, अविनाश जठार, महेश गायकवाड, निलेश कुरुमकर, गौतम दांगडे, भास्कर कुदांडे, यश मोटे,
संदिप लबडे आदी तर कोंभळी फाटा येथे ज्ञानेश्वर बोरुडे, भाऊसाहेब पठारे, संदिप बोरुडे, नवनाथ डोके यांच्यासह सकल मराठा समाज उपस्थीत होता. श्रीगोंदा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता.