दुधाचे दर सध्या खूपच खाली आले आहेत. एकीकडे खुराकाचे वाढते भाव अन दुसरीकडे दुधाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे. ठिकठिकाणी शेतकरी दूध रस्त्यावर ओतून आंदोलन करत आहेत.
दरम्यान आता पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मोठे वक्त्यव्य केले आहे. ते म्हणाले की, दूधाला प्रति लिटर किमान ३४ रुपये दर दिलाच गेला पाहिजे आणि जर याबाबत खासगी दूध संघ ऐकणार नसतील तर त्यांचे परवाने रद्द करावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पहा नेमके काय म्हणाले विखे पाटील
दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे हे कामानिमित्त मुंबईला गेले होते. तेथून ते कोल्हापूरला परतत असताना ते एका हॉटेलवर थांबले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना दूध दराच्या आंदोलनाबात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, दूधाला प्रति लिटर ३४ रुपये भाव दिलाच गेला पाहिजे.
परंतु काही दूध संघ सरकारचा आदेश पाळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. जर कुणी दुधाच्या भावाबाबत ऐकणार नसेल तर खासगी दूध संघाचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे ते म्हणाले. तसेच राज्यात सध्या ३० टक्के दुधात भेसळ असून हे तात्काळ थांबवणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
विखे पाटील यांनी नुकतीच एक बैईथक देखील बोलावली होती
सह्याद्री अतिथीगृहावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध दराबाबत चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली होती. यात लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, दूध कंपन्यांचे प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आदींना बोलावेल होते व यावेळी दूध दराबाबत चर्चा केली. सरकारने दूध खरेदीचा दर प्रतिलिटर ३४ रुपये निश्चित केला होता परंतु सरकारने प्रस्तावित केलेली दुधाची किंमत दूध उत्पादक कंपन्यांनी मान्य करण्यास नकार या बैठकीत दिला असल्याचे साधारण समजते.