Chandbibi Mahal : चॉदबीबी महाल, बारादरी परिसरात गेल्या दोन वर्षांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याचे अनेकांना अनुभवायला मिळाले आहे. त्यातच बुधवारी (दि.) रात्री १२ च्या सुमारास मुकुल माचवे यांना या भागात पुन्हा बिबट्याचे दिसला.
त्यांनी लगेच रात्री व्याघ्र संरक्षण समिती सदस्य मंदार साबळे यांना याबाबत माहिती दिली. या भागात बिबट्या वास्तव्यास असला तरी त्याचा काहीही उपद्रव नाही. आता पाऊस पडत असल्याने गवत वाढते व चांगले लपन तयार होते.
यात अनेक वन्यजीव दडून बसलेले असतात त्यामुळे मुख्य रस्ते सोडून कोणीही आडवाटेस जाऊ नये. या भागातील रहिवाशी व महालावर फिरायला जार्णाया पर्यटकांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी असे आवाहन साबळे यांनी केले आहे.
तसेच शेतीची कामे करताना लहान मुले सोबत असतील तर त्यांना एकटे सोडू नये. मुख्यतः बिबट्या दिवसा विश्रांती घेतो व सायंकाळनंतर तो शिकारीसाठी बाहेर पडतो मात्र कधीकधी स्थलांतर करताना किंवा बिबट्या आजारी किंवा जखमी असल्यास दिवसाही नजरेस पडू शकतो.