नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी साडेतीन कोटींचा निधी प्राप्त

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-ससप्टेंबर, ऑक्टोबर महिन्या दरम्यान अतिवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांचे बाजरी, सोयाबीन, कपाशी, भुईमूग, मका आदी खरीप पिकांसह ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाले होते.

या अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी राहाता तालुक्याला पहिल्या टप्प्यात 3 कोटी 60 लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्रशासनाकडून तालुक्यातील चार महसूल मंडळातील पंचनामे झालेल्या शेतकर्‍यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्यास सुरवात झाली असल्याची माहिती राहात्याचे नायब तहसिलदार भांगरे यांनी दिली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी दोन टप्पे करण्यात आले असून पहिला हप्ता प्राप्त झाले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी दिली. राहाता तालुक्यातील पुणतांबा, लोणी, शिर्डी व बाभळेश्वर मंडळातील काही गावांमधील शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात मदतीचे वाटपाचे काम सुरू झाले असून

निधीअभावी राहाता मंडळ व बाभळेश्वर मंडळातील काही गावांमधील शेतकर्‍यांना दुसर्‍या टप्प्यात नुकसानीच्या मदतीचे वाटप होणार असल्याची माहिती भांगरे यांनी दिली.

दरम्यान भाजपनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना धीर दिला होता. तसेच नुकसानीची पाहणी करून पंचनाम्याबाबत अधिकार्‍यांना आवश्यक सुचना केल्या. महसुल व कृषी विभागाकडून राहाता तालुक्यातील पाच मंडळात जवळपास 6 हजार 800 हेक्टरचे पंचनामे करण्यात आले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment