उसने घेतलेले पैसे देण्यास नकार; डॉक्‍टरांना नऊ लाखास गंडा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- शहरातील बालरोग तज्ञ डॉ. अनिलकुमार मुरलीधर कुऱ्हाडे (वय 67 रा. सावेडी) यांनी एका व्यक्तीला 14 लाख 50 हजार रूपये उसने दिले होते. त्यापैकी त्या व्यक्तीने नऊ लाख रूपये परत न देऊन त्यांची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी डॉ. कुऱ्हाडे यांनी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सागर अप्पासाहेब दिवटे (रा. अहमदनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. कुऱ्हाडे यांच्याकडून आरोपी सागर याने रोख, आर.टी.जी.एस. आणि नेट बॅंकिंगद्वारे 14 लाख 50 हजार रुपये हात उसने घेतले.

डॉ. कुऱ्हाडे यांनी सागर याला वेळोवेळी पैसे मागितले असता पाच लाख 50 हजार रुपये बॅंक खात्याद्वारे दिले. उर्वरित रक्कमेपोटी तीन लाख आणि एक लाख रुपयांचा धनादेश दिला होता.

डॉ. कुऱ्हाडे यांनी हा धनादेश पंजाब अॕण्ड सिंध बॅंकेत भरला असता, बॅंक खात्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने धनादेश वटला नाही. सागर याने पैसे परत देण्यास नकार दिला.

त्यामुळे डॉ. कुऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा व विश्‍वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe