Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या प्रश्नाबाबत आ. नितेश राणे विधानसभेत आक्रमक

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील उंबरे येथील अल्पवयीन मुलींचे धर्मांतर प्रकरणी वाचविण्यासाठी गेलेल्या युवकांवर गुन्हे दाखल करून अटक झाली. त्यातील प्रतीक धनवटे नावाच्या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली, असा आरोप आ. नितेश राणे यांनी विधानसभेत केला.

जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी काल बुधवारी (दि. २) सकाळी विधानभवनात आ. नितेश राणे यांची भेट घेऊन उंबरे येथील प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.

त्यानंतर दुपारी आ. राणे यांनी विधानसभेत उंबरे येथील अल्पवयीन मुलींचे धर्मांतर प्रकरणी या मुलींना वाचविण्यासाठी गेलेल्या युवकांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. आता त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. परंतु त्यातील प्रतिक धनवटे नावाच्या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.

यावर महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण संबंधित ठिकाणी जाऊन आलो असून जर यामध्ये युवकांना मारहाण झाली असेल, तर यामध्ये दोषींवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, उंबरे येथील प्रकरणी विधानसभेत आ. नितेश राणे यांनी व आदी विधानपरिषदेत आ. प्रसाद लाड यांनी आवाज उठविल्याने ग्रामस्थांनी याप्रकरणी निर्णायक भूमिका घेतल्याबद्दल पालकमंत्री ना. विखे पाटील व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe