निष्ठा प्रशिक्षणासाठी नगर जिल्ह्यत 894 शिक्षकांची नोंदणी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर अध्यापन करणार्‍या शिक्षकांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद च्या वतीने आयोजित केलेल्या निष्ठा दोन प्रशिक्षणात राज्यातून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

राज्यातील 1लाख 77 हजार शिक्षकांपैकी 28 हजार 896 शिक्षकांनी नोंदणी केली आहेत. त्यापैकी सहा हजार 632 शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून पाच हजार 44 शिक्षकांना प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने केंद्रीय राष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद च्यावतीने माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या निष्ठा दोन प्रशिक्षणात अहमदनगर जिल्ह्यातून सुमारे साडेआठ हजार शिक्षकांपैकी अवघ्या 894 शिक्षकांनी नोंदणी केली आहे.

216 शिक्षकांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तर 188 शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. नाशिक विभागातील धुळे येथील 635, जळगाव 1978, नाशिक 1347, नंदुरबार अवघे 257 शिक्षकांनी नोंदणी केली आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News