निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- आज सकाळी सहा वाजता निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनात साधारण अर्धा टीएमसी पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती, यामुळे धारण साठ्यात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

मात्र आता पाऊस थांबून बरेच दिवस झाले सध्या प्रवरा नदीचे पात्र अनेक ठिकाणी कोरडे पडले असून नदी काठच्या अनेक गावांना पाणी टंचाई जाणवत आहे.

मागील काही दिवसांपासून अकोले शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. लाभ क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी हे आवर्तन सोडण्यात आले आहे.

आज सकाळी निळवंडे धरणातून 1300 क्यूसेक विसर्ग प्रवरा नदीत सोडण्यात आले आहे. हे आवर्तन सुमारे 5 दिवस सुरू राहील व त्यात साधारण 500 दलघफु पाणी वापर होण्याची शक्यता आहे.

निळवंडे आणि भंडारदरा ही दोन्ही धरणे सध्या काठोकाठ भरलेली आहेत. भंडारदरा धरणात 11039 दलघफु तर निळवंडे धरणात 8328 दलघफु पाणी साठा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe