अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-राज्यात गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे. गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना संगमनेरात मात्र या कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे.
वाढते कत्तलखाने व गोवंश मांसाची तस्करीमुळे संगमनेर हे महाराष्ट्रातील गोवंश हत्येचे व गोमांस तस्करीचे केंद्र म्हणून कुप्रसिद्ध झाले आहे.
नुकतेच संगमनेर शहरात कत्तलीसाठी ६ गायी घेऊन जाणारा पिकअप शहर पोलिसांनी पकडून गायींची सुटका केली. ही कारवाई खांडगाव रस्त्यावर करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलिसांनी तब्बल चार लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेत चालकावर गुन्हा दाखल केला. पिकअपमध्ये (एमएच १३ आर ८००४) कत्तलीसाठी गोवंश जनावरे घेऊन जात असल्याची माहिती निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाली.
त्यांनी पथक पाठवून पिकअप अडवला. तपासणी केली असता त्यात ६ गायी आढळून आल्या. पिकपसह चालकाला ताब्यात घेण्यात आले. कॉन्स्टेबल सुनील उगले यांच्या फिर्यादीवरून अन्वर बाबू तांबोळी (४२, कोतुळ, ) याच्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved