अहमदनगरकरांना दिलासा ! जिल्ह्यात स्वाइन फ्लू व गोवरचा ज्वर ओसरला, एकही रुग्ण नाही

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात स्वाइन फ्लू व गोवर आजाराचा एकही रुग्ण सद्यस्थितीत नाही. त्यामुळे या आजारांचा जोर जिल्ह्यातून ओसरला आहे असेच म्हणावे लगेल.

आरोग्य विभागामार्फत किटकजन्य व जलजन्य आजाराचा अहवाल तयार करण्यात आलाय. या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे विविध साथीच्या आजारांशी झुंजणाऱ्या नगरकरांना दिलासा मिळाला आहे.

* काय म्हणतोय आरोग्य विभागाचा अहवाल

जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत विविध आजारासंदर्भात अहवाल तयार केलेजातात. त्यानुसार विविध उपाययोजना ही यंत्रणा करत असते. त्यानुसार नुकताच किटकजन्य व जलजन्य आजाराचा अहवाल आरोग्य यत्रंणेने तयार केला आहे.

यात म्हटलं आहे की, वर्षभरात जिल्ह्यात गोवरचा एकही नवीन रूग्ण आढळला नाही. स्वाइन फ्लूचे मात्र वर्षभरात केवळ दोन रूग्ण आढळून आले. आता या घडीला मात्र स्वाईन फ्लू व गोवर बाधित रुग्ण जिल्ह्यात एकही नाही.

यासाठी यंत्रणेने तब्बल ७२ हजार ७१२ रुग्णांची तपासणी केली. याचप्रमाणे त्यांच्या संपर्कात आलेल्या रूग्णांवर देखील उपचार करण्यात आले. त्यानुसार वरील अहवाल आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातून गोवर व स्वाइन फ्लू यांचा जोर जिल्ह्यातून ओसरला आहे असेच म्हणावे लागेल.

* डासांचा प्रादुर्भाव, चिकनगुनिया, गोचिडतापाचे रुग्ण

गोवर व स्वाईन फ्ल्यू बाबत जरी दिलासा देणारी बातमी असली तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी डासांचा प्रादुभाव आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या चिकनगुनिया, गोचिडतापाचे रुग्ण आढळून येत आहेत. अनेक गावांत,

केडगाव उपनगरात याचे जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या आजारांसंदर्भात उपाययोजना करणे गरजेचे आहे. फवारणी, साफसफाई आदींवर जोर देऊन डास उत्पत्ती थांबवण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही प्रयत्न करणे गरजेचेच आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe