अहमदनगर आणि नाशिकला दिलासा ! पावसाने जायकवाडीला धरणातून वाहून …

Ahmednagarlive24 office
Published:

नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यात तसेच धरण क्षेत्रात रविवार (दि.२६) रोजी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे वहन तूट होणार नाही. यामुळे वहन तुटीचे पाणी धरणामधुन सोडू नये, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांच्याकडे केली.

ही मागणी मान्य करत तसे सुधारित आदेश दिल्याने नगर नाशिकचे पाऊण टीएमसी पाणी वाचल्याची माहिती आमदार काळे यांनी दिली आहे.बहुतांश धरणांमध्ये पावसाचे नवीन पाण्याची आवक झालेली आहे. त्याचप्रमाणे जायकवाडी धरणातही नवीन पाण्याची आवक होत आहे.

त्यामुळे वहन व्ययाचे पाणी सोडण्याची आवश्यकता नसल्याची मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्याकडे केली होती.

या मागणीची दखल घेऊन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी पाणी सोडण्याबाबत फेरनियोजन करण्याचे सुधारित आदेश दिले आहेत, असे आमदार आशुतोष काळे म्हटले.

वेळीच नगर-नाशिकच्या धरणातील पाणी जायकवाडीला सोडू नये यासाठी पाठपुरावा केल्याने आमदार काळे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, वाचणाऱ्या पाण्यातून नगर-नाशिकच्या धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याने त्यांनी याचे स्वागत केले आहे.

फेरनियोजनाने असे वाचेल पाणी
मुळा धरणातून नियोजित २.१० ऐवजी १.९६ टीएमसी, वाचणारे पाणी ०.१४० टीएमसी, प्रवरा (निळवंडे) नियोजित ३.३६ एवजी ३.१४ टीएमसी, वाचणारे पाणी ०.२२० टीएमसी,

गंगापूर धरणातून नियोजित ०.५० ऐवजी ०.३५ टीएमसी, वाचणारे पाणी ०.१५० टीएमसी, गोदावरी दारणा धरण नियोजित २.६४३ ऐवजी २.३९ टीएमसी, वाचणारे पाणी ०.२५३ टीएमसी असे एकूण ०.७६३ टीएमसी पाणी वाचणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe