याद राखा आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- आम्ही राजकारण व कटकारस्थानाच्या नादी न लागता लोकांची कामे करण्यावर भर देतो. काहीजण मात्र पराभवाच्या नैराश्यातून अजुन बाहेर पडलेले दिसत नाहीत.

म्हणूनच आपल्या राजकारणाला अडचण ठरणाऱ्या निष्पाप कार्यकर्त्यांना विनाकारण खोटया पोलिस केसेसमध्ये अडकवण्याचे विषारी राजकारण सुरू झाले आहे.

पण याद राखा आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला, तर हा कुटील डाव तुमच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कुणाचे नाव न घेता दिला. नागरदेवळे येथील ग्रामपंचायत सदस्य व युवा नेते महेश झोडगे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते.

नगर तालुक्यातील शिवसेना नेते व तनपुरे यांचे समर्थक गोविंद मोकाटे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. या पार्श्वभूमीवर नामदार तनपुरे यांनी सुचक विधान करत नाव न घेता िवराेधकांवर टीका केली.

त्यांच्या टिकेचा रोख हा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्याकडेच होता, अशी चर्चा कार्यक्रम स्थळी सुरू हाेती. तनपुरे म्हणाले, लोकांना प्रेमाने जवळ करायचे असते मचग ते आपली होतात, कोणाला अडकवुन तो जवळ येत नाही.

वरिष्ठ पातळीवर पण अशाच पद्धतीने ईडी, सीबीआयच्या माध्यमातून कुटील डाव सुरू आहेत. आम्ही नामदार नवाब मलिक यांच्याकडून खूप काही शिकलो आहोत, जशास तसे उत्तरे दिली जातील.

कार्यकर्त्यांनी घाबरण्याचे कारण नाही, मी तुमच्या पाठीशी असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. महेश झोडगे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले. शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले. गरजू माहिलांना ब्लॅकेंटचे वाटप करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe