महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार….

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची झालेली यशस्वी वाटचाल विकसनशील भारताच्या प्रगतीचा मार्ग ठरला आहे. योजनांच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत झालेल्या

क्रांतिकारी बदलांमुळेच भारत देश जगात नेतृत्व करण्यास सिद्ध झाला असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

राहाता तालुक्यातील रांजणखोल येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी सहभाग नोंदविला. या निमित्ताने आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या कार्डचे वितरण करण्यात आले.

तसेच शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरण आणि सेंद्रीय शेतीवरील प्रबोधनात्म कार्यक्रम लक्ष्यवेधी ठरला. अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर, जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. नागरगोजे,

जिल्हा अधीक्षक सुधाकर बोराळे, प्रातांधिकारी किरण सावंत, गटविकास आधिकारी जालिंदर पठारे, आरोग्य आधिकारी डॉ. घोलप, पशूसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनिल तुंबारे, ज्येष्ठ नेते आंबादास ढोकचौळे,

सरपंच शुभांगी ढौकचौरे, दत्तात्रय गोरे, सुभाष गायकवाड, चांगदेव ढौकचौळे, बाबासाहेब ढोकचौळे, आण्णासाहेब सदाफळ, सोमनाथ गोरे, नानासाहेब शिंदे, शरद नवले आदी याप्रसंगी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, विकसित भारताचे ध्येय साध्य करताना देशाच्या प्रगतीबरोबरच समाजातील सामान्य माणूस विकास प्रक्रियेचा घटक बनावा, यासाठी केंद्र सरकारने शंभरहून अधिक योजना गावापर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचविण्याचा

एक प्रकारे जागर सुरु केला आहे. योजनेपासून वंचित राहिलेल्या घटकाला योजनेचा लाभ मिळावा, हा उद्देश या संकल्प यात्रेचा असून, या निमित्ताने आधिकारी आणि कार्यकर्त्यांनी योग्य समन्वयाने गावांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वखाली केंद्र सरकारने नऊ वर्षांत विद्यार्थ्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत आणि छोट्या व्यावसायिकांपासून ते उद्योजकापर्यंत विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्यानेच देशाची विकास प्रक्रीया वेगाने पुढे जात आहे.

योजना सुरु झाली आणि बंद झाली, असे एकही उदाहरण नाही, असे स्पष्ट करुन केंद्र सरकारची यशस्वी वाटचाल हाच देशाच्या प्रगतीचा मार्ग बनला असल्याने आज जगाचे नेतृत्व करण्यासाठी आपला देश सिद्ध झाला आहे.

याकडे लक्ष वेधून एक विकसनशील राष्ट्र म्हणून देशाची प्रतीमा निर्माण होत असतानाच देशाच्या आर्थिक विकासाचा पायाही मजबुत होत आहे. त्यामुळे आता देशात गुंतवणूक करण्यासाठी देश स्वतःहून पुढे येत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

मंत्री विखे यांनी पुढे म्हटले, की शेतीतही आता आधुनिकीकरण आणून यामध्ये महिला बचत गटांना संधी देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे.

यासाठी ड्रोनदीदी योजना केंद्र सरकारने सुरू केली असून, देशातील १५ हजार बचत गटांना ड्रोनचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने ८० टक्के अनुदान दिले आहे. शेती व्यवसायातील कष्ट वाचविताना बचत गटांनाच उत्पन्नाचे साधन निर्माण करुन देणारी योजना हा बदलत्या भारताचा परिणाम असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी आवर्जून सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe