Ahmednagar News : केंद्र सरकारने लागु केलेल्या हिट ॲण्ड रन या कायद्याविरोधात देशभर वाहतूकदारांनी आपला विरोध व्यक्त केला आहे. त्यातच आता जामखेड येथील रिक्षा चालक-मालक सेवाभावी संस्थेच्यावतीने या काद्याला विरोध करण्यासाठी दोन दिवस रिक्षा बंद ठेऊन सरकारचा निषेध केला आहे. या बाबत तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
या बाबत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने हिट ॲण्ड रन हा कायदा देशातील सर्व वाहनासाठी लागु केला आहे. त्याच्या अटी व नियम जाचक असुन त्यामध्ये वाहन चालकाकडून अपघात झाल्यानंतर तो पळुन गेल्यास ७ लाख रूपये किंवा १० वर्ष तुरूंगवास असा कायदा केला आहे.

त्यामुळे अनेक तरूण युवक या व्यवसायकडे येणार नाहीत. यामुळे आणखी बेरोजगारी वाढेल. या कायद्यातील जाचक नियम शिथील करण्यासाठी तसेच केलेल्या या कायद्याच्या निषेधार्थ जामखेड तालुक्यातील सर्व रिक्षा दि.१० व ११ जानेवारी या दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत.