पोलीस असल्याची बतावणी करत एकास लुटले; पाथर्डीतील घटना

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- मी पोलीस आहे,तुम्ही असे गळ्यात सोन्यांची चैन व हातात सोन्याची अंगठी घालून का फिरता. येथे खुप चोर्‍या होत आहे. तुम्ही हा ऐवज तुमच्या पिशवीत ठेवा, असे म्हणून एक व्यक्ती कडील तोळ्यांचे दागिणे चोरट्याने लंपास केल्याची घटना पाथर्डी शहरातील माणिकदौडी चौकात घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, शेळके हे माणिकदौडी चौक येथून घरी पायी जात असतांना चौकात हेल्मेट घातलेला एक व्यक्ती दुचाकीवरून शेळके यांच्याकडे आला. मी पोलीस आहे.

तुम्ही असे गळ्यात सोन्यांची चैन व हातात सोन्याची अंगठी घालून का फिरत आहात. येथे खुप चोर्‍या होत असून तुमच्या पिशवीत ठेवा.

त्याच ठिकाणी आणखी एका व्यक्तीला बोलावून घेतले व त्याला सांगीतले, की तु तुझ्या गळ्यातील सोन्यांची चैन तुझ्या पिशवीत काढुन ठेव येथे खुप चोर्‍या होत आहेत.

त्या इसमाने त्याच्या गळ्यातील चैन त्याच्याच पिशवीत काढून ठेवली. त्यावेळी शेळके यांनी सोन्याचा ऐवज स्वतःच्या पिशवीत काढुन ठेवला.

त्या व्यक्तीने शेळके यांच्या पिशवीला गाठ मारुन दिली व तुम्ही आता लगेच घरी जा असे म्हणाला. शेळके यांनी घरी जावून पिशवीत पहिले असता चैन व अंगठी मिळून आली नाही.

याप्रकरणी आण्णासाहेब शेळके (रा. विजयनगर ता. पाथर्डी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पाथर्डी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.p

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe