ग्रामीण रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी : आ.मोनिका राजळे

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव -पाथर्डी मतदारसंघात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन मंडळाचा १ कोटी ४० लक्ष निधी रस्त्यांसाठी खर्च करण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी मिळविण्यात अडचणी येत होत्या; परंतु गेल्या दीड वर्षात शिंदे – फडणवीस व पवार सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वाधिक निधी आणून मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यात आली असून,

ग्रामीण रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. आपण मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची भूमिका घेतली असून, वीज, पाणी, रस्ते, हे महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी निधी देण्यात असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

मळेगाव येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी आ. राजळे बोलत होत्या. या वेळी बापुसाहेब भोसले, बापुसाहेब पाटेकर, ताराचंद लोंढे, दत्तात्रय निकम, शिवाजीराव भिसे, महेश फलके, सागर फडके, संजय खरड, विठ्ठल आरेकर, विठ्ठल निकम,

मनोज फरताळे, हनुमान बडे, संदीप वाणी, सोमनाथ कळमकर, सचिन कोळगे, रामभाऊ कोळगे, विनोद निकम, सचिन निकम, रमेश कळमकर, राजेंद्र पुडेंकर, आकाश साबळे, आदी उपस्थित होते.

आ. राजळे म्हणाल्या की, निवडणुका जवळ आल्यावरच विरोधक नारळ फोडतात, साड्या व भांडे वाटप करतात; परंतु त्यांचा पक्ष कोणता हे निश्चित नाही. पाटपाण्यासंदर्भात टेलपर्यंत पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून,

लोकसभा निवडणुकीनंतर उर्वरित कामे मार्गी लावण्यात येतील, असेही त्या म्हणाल्या. या वेळी बापुसाहेब पाटेकर यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक शिवाजी भिसे यांनी केले. रामेश्वर निकम यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe