Ahmednagar News : माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे त्यांच्या समाजिक, राजकीय जीवनात विविध विषयावर लिहीलेल्या लेखांचे व त्यांच्या वैशिष्टपूर्ण कार्याची ही माहिती पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन माजीमंत्री राम शिंदे यांनी केले.
महेश जोशी लिखीत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार पुस्तकाचे प्रकाशन येथील अलंकापूरी नगरी येथे नुकतेच झाले. यावेळी राम शिंदे बोलत होते. याप्रसंगी महंत रामगिरी महाराज व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे उपस्थित होते.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याची नोंद घेत इतर मान्यवरांनी केलेल्या लिखाणाचे संकलन वीरेंद्र मधुकर जोशी यांनी केले. त्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली. या पुस्तकाचे संपादन पत्रकार महेश मधुकर जोशी यांनी केले. पुस्तक निर्मितीसाठी सर्वेश व मयुर जोशी यांनी मोलाची साथ दिली. महंत रमेशगिरी महाराज यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
विविध एकोणावीस लेखांचा संग्रह आहे. तर मुखपृष्ठाचे आतील व मलपृष्ठावर स्व. शंकरराव कोल्हे यांना त्यांच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक आदी कार्याबद्दल ७२ वर्षात मिळालेल्या १३ पुरस्कारांची व राममंदिर (अयोध्या) निर्माण कार्यासाठी केलेले अर्थसहाय्य यासह १४ रंगीत छायाचित्रांचा यात समावेश आहे. पुस्तकाचे टंकलेखन व मुद्रितशोधन सुप्रिया मयुर जोशी यांनी केले आहे. यासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे क्षेत्रीय अधिकारी अनंत विष्णू वाघ यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.