अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- सावेडी उपनगरातील नव्याने विकसीत होत असलेल्या तपोवन रोड परिसर हातभट्टी विक्रेचे केंद्र बनला आहे. तोफखाना पोलिसांनी कारवाई करून एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Ahmednagar Crime)
अजूनही या परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टी विक्री केली जात आहे. तोफखाना पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकून हातभट्टीची विक्री करणारा साहेबा तायगा शिंदे (रा. वैदुवाडी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
त्याच्याकडून 17 लीटर दारू जप्त केली आहे. ही दारू प्लॉस्टीकच्या पिशवीमध्ये भरून तो विकत होता. दरम्यान तपोवन रोड परिसरात अजूनही हातभट्टी विक्री केली जात असून यावरही पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम