७ फेब्रुवारी २०२५ नगर : जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आलेला सलमान मेहबूब खान (वय ३०, रा. कोठला, घास गल्ली, अ.नगर) शहरात वास्तव्य करताना आढळून आल्याने तोफखाना पोलिसांनी त्यास पकडले आहे.मंगलगेट परिसरात कोठला येथे ५ फेब्रुवारीला ही कारवाई करण्यात आली आहे.त्याने हद्दपारीच्या आदेशाचा भंग केला होता.
त्याला या पूर्वीही १५ जुलै २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेने पकडले होते.आरोपी सलमान महेबूब खान याला प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी ३० एप्रिल २०२४ च्या आदेशानुसार जिल्ह्यातून २ वर्षांकरिता हद्दपार केले होते.तरीही तो या आदेशाचा भंग करून तो अहिल्यानगरमध्ये आला असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरून पोलिस कोठला स्टॅण्ड येथील कुरेशी हॉटेल जवळील बापू शहा दर्गाजवळ गेले. तेथे एक इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव विचारले असता त्याने सलमान मेहबुब खान असे असल्याचे सांगितले.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-8.jpg)
या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी पोलिस कॉन्स्टेबल सतिष त्रिभुवन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सलमान खान याच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलिस अंमलदार डी. बी. जपे, इनामदार, वसिम खान पठाण यांनी केली. आरोपी सलमान खान याची हद्दपारी आदेशाचा भंग करण्याची ही दुसरी वेळ आहे. त्याला या पूर्वीही १५ जुलै २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेने पकडले होते.