AhmednagarLive24 : तालुक्यातील मालुजे खुर्द-मालगाव शिवारात सुरू असलेल्या वाळूच्या लिलावाच्या ठिकाणी ढिगाऱ्यावर एक डंपर पलटी होऊन डंपरखाली चालक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
दत्तात्रय राजू लष्करे (राहणार राहुरी गावठाण वय 38) असं या मृत चालकाचं नाव आहे.
आज सकाळच्या दरम्यान येथे वाळूने भरलेला डंपर चालला असता सदर डंपर एका ढिगा-यावरून घसरण्यास लागला असता डंपर पलटी होणार तोच सदर चालकाने स्वतःचा बचावासाठी खाली उडी घेतली.
मात्र दुर्दैवाने तोच ढंपर त्याच्या अंगावर पलटी झाल्याने दर चालक जागीच ठार झाला.