Sangamner News : विजेच्या धक्क्याने गायीचा मृत्यू ! महावितरणच्या तुटलेल्या वीज वाहक तारेच्या धक्का…

Published on -

महावितरणच्या तुटलेल्या वीज वाहक तारेच्या धक्का बसून शिबलापूर (ता. संगमनेर) येथे एका दुभत्या गायीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर रक्टे हे आपली जनावरे चारण्यासाठी शिबलापूर-संगमनेर रस्त्यावरुन घेऊन चालले होते.

यावेळी हॉटेल पाहुणचार समोर तसेच संगमनेर कारखान्याच्या शेतकी गट कार्यालयानजीक एक वीज वाहक तार तुटून पडलेली होती. याठिकाणी गायी येतांच तिला विजेचा धक्का बसला व दुभती गाय जागेवर कोसळत गतप्राण झाली. यामुळे रक्टे यांचे अंदाजे १ लाख ६० रुपये नुकसान झाले असून त्यांना आता मोठ्या अर्थिक चणचणीचा सामना करावा लागणार आहे.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रमोद बोंद्रे, दिलखुश शेख, राजेंद्र नांगरे, नवनाथ नांगरे, गजानन बोंद्रे, योगेश नांगरे, महेश रक्टे, प्रकाश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रशासनाला याबाबत माहिती दिली.

त्यानंतर घटनास्थळी कामगार तलाठी सुमित जाधव, ग्रामसेवक सुरेंद्र ब्राम्हणे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एल. एम. तांबे, वायरमन कैलास कुदळ, ग्रामपंचायत कर्मचारी रमेश मुन्तोडे यांनी येऊन या घटनेचा पंचनामा केला आहे.

दरम्यान, याप्रसंगी ज्ञानदेव नांगरे, सुभाष मुन्तोडे, बबन म्हस्के, राजु रक्टे, आण्णा रक्टे, राजेश उदावंत, राजेंद्र बोंद्रे, सागर मुन्तोडे आदी नागरीक उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News