संगमनेरकरांची झाली स्वप्नपूर्ती ; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मंजुरी : वाहनांची नोंदणी देखील येथेच होणार..!

Pragati
Published:

Ahmednagar News : शहरातील बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणी संदर्भात सतत केलेल्या पाठपुराव्याला तसेच नागरिकांच्या सोयीकरता येथे स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे. यासाठी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी अंतिम मंजुरी दिली, अशी माहिती विधान परिषद सदस्य आ.सत्यजित तांबे यांनी दिली.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा संगमनेर येथे बस स्थानकासमोर व्हावा, अशी तमाम संगमनेरकरांची मागणी होती. वेळोवेळी यासाठी पाठपुरावा करण्यात आला. तसेच संगमनेर तालुक्यात सर्वाधिक चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्या असून, नागरिकांच्या सोयीकरिता संगमनेरमध्ये स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे.

यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी मोठा पाठ पुरावा केला होता. आता त्याला यश आले असून या दोन्ही कामांशी मंजुरी मिळाल्याने लवकरच संगमनेरकरांची स्वप्नपूर्ती होणार आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा संगमनेर येथे बस स्थानकासमोर व्हावा, अशी तमाम संगमनेरकरांची मागणी होती. संगमनेर पालिकेने २०१८ साली एसटी महामंडळाकडे अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा मिळावी, अशी प्रस्तावाव्दारे मागणी केली होती.

यासाठी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी मोठा पाठपुरावा केला. २०१९ सालानंतर सतत आ. बाळासाहेब थोरात व आ. सत्यजित तांबे यांनी पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला.अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अश्वारूढ पुतळ्यास अंतिम मंजुरी दिली. यामुळे आता लवकरचं संगमनेरच्या हायटेक बसस्थानकासमोर सुशोभीकरणासह भव्य असा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहणार आहे.

संगमनेर तालुक्यात सर्वाधिक चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्या असून, नागरिकांच्या सोयीकरिता संगमनेरमध्ये स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे, याकरिता आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगमनेरमध्ये कायमस्वरूपी शिबीर कार्यालय मंजूर केले असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

नवीन आरटीओ ऑफिस हे फक्त जिल्हा स्तरावर मंजूर होत असल्याने यातून मार्ग काढत संगमनेर करिता कायमस्वरूपी शिबीर कार्यालय मंजूर केले आहे. विविध वाहनांची पासिंग, त्याचप्रमाणे लर्निंग लायसन, परमनंट लायसन याकरिता नागरिकांना श्रीरामपूरला जावे लागत होते .

त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र, आता या नवीन शिबिर कार्यालयामुळे ही सर्व कामे संगमनेरातच होणार असल्याने आता नागरिकांची मोठी सोय होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe