अहिल्यानगर तालुक्यातील ‘या’ ९८ गावांसाठी आजपासून सरपंच आरक्षण सोडत, जनतेतून निवडला जाणार गावकारभारी!

नगर तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींसाठी २०२५ ते २०३० कालावधीसाठी सरपंच आरक्षणाची सोडत आजपासून सुरू होत आहे. प्रथमच सरपंचांची निवड जनतेतून होणार असून, सोडत २३-२४ एप्रिल रोजी केडगाव येथे होणार आहे.

Published on -

केडगाव : अहिल्यानगर तालुक्यातील २०२५ ते २०३० या पाचवर्षीय कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ च्या नियम २ अ अंतर्गत ही सोडत २३ आणि २४ एप्रिल २०२५ रोजी घेतली जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार संजय शिंदे यांनी दिली. विशेष म्हणजे, तालुक्यातील ९८ गावांमध्ये प्रथमच सरपंचाची निवड थेट जनतेमार्फत होणार असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

९८ गावांसाठी सरपंच आरक्षण सोडत

नगर तालुक्यात एकूण १०५ ग्रामपंचायती असून, त्यापैकी ९८ गावांसाठी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी ही सोडत होत आहे. हा कार्यक्रम २३ आणि २४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील राजर्षी शाहू महाराज सभागृहात पार पडणार आहे. २३ एप्रिल रोजी होणाऱ्या सोडतीसाठी तहसीलदार प्राधिकृत अधिकारी म्हणून काम पाहतील, तर २४ एप्रिल रोजी महिला आरक्षणासाठीच्या सोडतीचे प्राधिकृत अधिकारी उपविभागीय अधिकारी असतील. थेट जनतेतून सरपंच निवडीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

या गावांचा समावेश

या सोडतीत सहभागी गावांमध्ये देहरे, नांदगाव, कोळपे आखाडा ग्रुप, शिंगवे, इस्लामपूर ग्रुप, विळद, निमगात घाणा, कर्जुने खारे, इसळक, पिंपरी घुमट, पिंपळगाव माळवी, पिंपळगाव उज्जैनी, डोंगरगण, मांजरसुंबा, धनगरवाडी, इमामपूर, शेंडी, पोखर्डी, नागरदेवळे, बुन्हाणनगर, कापूरवाडी, वारूळवाडी, जेऊर, आगडगाव, खोसपुरी, ससेवाडी, पांगरमल, बहिरवाडी, रतडगाव, देवगाव, उदरमल, निंबळक, वडगाव गुप्ता, हमीदपूर, नवनागापूर, नेप्ती, निमगाव वाघा, टाकळी खात गाव, हिंगणगाव, खात गाव टाकळी, जखनगाव, पिंपळगाव कौडा, हिवरे बाजार, पिंपळगाव वाघा, अरणगाव, दरेवाडी, वाकोड, वाळुंज, खंडाळा, सोनेवाडी, चास, सारोळा कासार, कामरगाव, अकोळनेर, जाधववाडी ग्रुप, घोसपुरी, भोरवाडी, खडकी, बाबुर्डी बेंद, चिचोंडी पाटील, मांडवे, टाकळी काझी, आठवड, उक्कडगाव, सांडवे, सारोळा बद्धी, मदडगाव, दशमी गव्हाण, निंबोडी, कोल्हेवाडी, वडारवाडी, बाराबाभळी, भातोडी, मेहेकरी, कौडगाव, जांब ग्रुप, रांजणी, पिंपळगाव लांडगा, सोनेवाडी, खांडके, बारदरी, शहापूर, केकती ग्रुप, माथनी, बाळेवाडी ग्रुप, वाळकी, देऊळगाव सिद्धी, बाबुर्डी घुमट, शिराढोण, हिवरे झरे, दहीगाव, साकत खुर्द, गुंडेगाव, सुईछत्तीशी, राळेगण, वडगाव तांदळी, गुणवडी, मठ पिंपरी, वाटेफळ, तांदळी वडगाव, हातवळण आणि आंबिलवाडी यांचा समावेश आहे.

लोकशाही बळकट होणार

थेट जनतेमार्फत सरपंच निवडण्याची ही प्रक्रिया गावागावांत लोकशाहीला बळ देणारी ठरणार आहे. यामुळे ग्रामपंचायत स्तरावर नेतृत्वाला नवे परिमाण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आरक्षण सोडतीनंतर निवडणूक प्रक्रियेचा मार्ग मोकळा होईल, आणि गावातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली असून, सोडतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News