Ahilyanagar News: आम्ही मढी ग्रामपंचायतीने घेतलेला ठराव विचार पुर्वक व नियमानुसारच घेतलेला आहे. पशुहत्येला बंदी असताना कानिफनाथगडाच्या पायथ्याला पशुहत्या करण्यात येत आहे.नाथांच्या रुढी व परंपरा पायदळी तुडविल्या जात आहेत. आमच्या माताभगीनीच्या दागीने व पैसे चोरण्याचे प्रकार वाढले आहेत.
अन्याय किती दिवस सहन करणार. आम्ही घेतलेल्या ठरावावर आम्ही ठाम अहोत. ९९ टक्के लोकांनी ठराव समंत केलेला आहे. राज्याचे मंत्री नितेश राणे २८ फेब्रुवारीला मढी येथे होळीपेटविण्यासाठी येत आहेत. त्यांची सभा देखील मढी .येथे होणार आहे. तयारी सुरु केली आहे. आता माघार घेतली जाणार नाही. आम्ही केलेला ठराव हा कायदेशीर व बरोबरच आहे.

मढीत कोणाचाही अवमान केला जात नाही. मात्र आमच्या भावना पायदळी तुडविल्या जात असतील तर त्या सहन करण्याचे कारण नसल्याचे सरपंच संजय मरकड यांनी सांगितले. तर दुसरीकडे मढी येथील ग्रामसभेतील मुस्लीम समाजाच्या व्यापाऱ्यांना केलेली बंदी बाबतचा ठराव चुकीचा असुन असा ठराव करताना ग्रामपंचायत नियमांचे उल्लंघन केले असल्याचा निष्कर्ष पंचायत समितीच्या अधिका-यांनी काढला आहे.
सहाय्यक गटविकासअधिकारी यांनी केलेल्या चौकशीत तसा अभिप्राय नोंदविला आहे. त्याबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाची धावपळ मंगळवारी रात्री उशीरापर्यंत सुरु होती. मढी ग्रामपंचायतीने केलेला ठराव अवैध असल्याची तक्रार शन्नो पठाण यांनी पंचायत समितीचे गटविकासअधिकारी शिवाजीराव कांबळे यांच्याकडे केली आहे.
आमच्या गावातील यात्रा कालावधीत नाथांच्या रुढी व परंपरा काही लोक पाळत नाहीत. अशा तक्रारी काही नाथभक्तांनी सरपंच यांच्याकडे केलेल्या आहेत. त्यावरुच तसा ठराव केल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. नाथ भक्तांच्या भावना दुखावल्या जात असतील तर आम्हाला कठोर निर्णय घ्यावेत लागतील व ठराव त्याच भावनेतुन केलेला आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता प्रशासन आणि ग्रामस्थ असे चित्र निर्माण झाले आहे. त्यात राणे हेदेखील मढीत येणार असल्याने आता ते काय भूमिका घेतात याकडे देखील राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.