अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी सरपंच उपसरपंचाचे उपोषण….

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यातील नदी काठच्या परिसरात आजही मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात आहे. मात्र या वाळू उपसा केल्याने त्या त्या परिसरातील शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसत आहे.

त्यामुळे अनेकदा प्रशासनाकडून आशा वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाई केली जाते. परंतु काही काळ लोटला की हे चक्र पुन्हा सुरू होते.

परंतु आता हा वाळू उपसा थांबवण्यासाठी चक्क सरपंच उपसरपंच यांनीच पुढाकार घेत थेट तहसीलदार यांच्या कार्यालयात उपोषण केले आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज येथील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करून वाळू उपसा थांबवण्यात यावा यासाठी अजनुज गावचे सरपंच प्रगती योगेश गिरमकर,

उपसरपंच विशाल कवडे पाटील यांच्यासह काही ग्रामस्थांनी आमरण उपोषण केले. नदी पाञातील फायबर बोट व सेक्सन पंप बंद करुन त्यांच्यावर कार्यवाई करावी,

तसेच अवैध वाळू वाहतुकीमुळे खराब झालेला अजनुज ते स्मशानभुमी रस्ता दुरुस्त करुन द्यावा अशा विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार मिलिंद कुलथे यांना दिले. त्यावर प्रकरणी कारवाई करणार असल्याचे लेखी पञ दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe