‘मला न्याय द्या’ असे म्हणत त्याने पोलिस अधीक्षक कार्यालयातच …!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  पारनेर तालुक्यातील रहिवाशी व सध्या पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्यात नेमाणुकीस असलेल्या एकाएका पोलिस कर्मचाऱ्याने ‘मला न्याय द्या’असे म्हणत

पोलिस अधीक्षक कार्यालयातच स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्नकेल्याची घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

जितेंद्र उर्फ हरिभाऊ मांडगे असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयात पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला

पोलिस कर्मचारी जितेंद्र उर्फ हरिभाऊ मांडगे (रा.पिंपरी गवळी ता.पारनेर) हा आला व त्याने येथील अधिकाऱ्याच्या दालनात घुसताच मला न्याय द्या, असे म्हणत

सोबत आनलेल्या कॅनमधील रॉकेल अंगावर ओतून काडी ओढून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच हा प्रकार येथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी झडप घालून त्याचा हा पेटवून घेण्याचा प्रयत्न हानून पाडला.

या संदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बेंडकोळी हे करत आहेत. या प्रकारामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe