अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता राज्यातील शाळा अद्यापही बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र या कोरोनाच्या या संकटाच्या काळात विद्यार्थ्यांविना शाळांची दुरावस्था झाली आहे.
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने अद्यापही अनेक शाळांकडे गुरुजी, कर्मचारी हे फिरकले नाही. अशीच काहीशी अवस्था सोनई येथील जिल्हा परिषद शाळेची झालेली आहे.
कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात शासन व शिक्षण विभागाने सात महिन्यापुर्वी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर एकही विद्यार्थी शाळेकडे फिरकला नाही.
विद्यार्थ्यांसाठी हा आदेश निघाला असला तरी या सात महिन्यात मुख्याध्यापक अथवा एकही शिक्षक फिरकला नाही हे विशेष. सोनई येथील महादेव मंदीर परीसरात जिल्हा परिषद शाळा, मुलींची शाळा व अंगणवाडी भरते.
आज या भागाला भेट दिली असता, खेळण्याच्या मैदानास गटारीचे स्वरुप येवून दुर्गंधी पसरली आहे. सर्वत्र कचरा साचला. गवत आणि काटेरी झाडे वाढली आहेत. स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे.
गावातील अन्य जिल्हा परिषद शाळेतही अशीच अवस्था पाहण्यास मिळाली. जिल्हा परिषद शिक्षण विभाग सभापती प्रताप शेळके यांनी सर्व शिक्षकांनी शाळेत हजर होवून शाळा व मैदान स्वच्छतेबाबत आदेश दिला.
मात्र महादेव मंदीर शाळेकडे कुणीच फिरकले नाही. मुख्याध्यापक विष्णु गवसने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे काम सोमवारी(ता.१२) पासून हाती घेवू असे सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved