अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- नगर जिल्ह्याची वाटचाल हि गुन्हेगारीकडे वाढू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. अशीच एक धक्कादायक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे.
चक्क एका महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह गटारीच्या एका टाकीमध्ये फेकून दिल्याची घटना संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गावाच्या हद्दीत घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, माझे घर हौसिंग सोसायटी परिसरातील श्रमिक विडी कामगारांच्या वसाहती जवळ असलेल्या एका सेफ्टी टँक मध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
ही माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी सदर महिलेचा मृतदेह सेफ्टी टँक च्या बाहेर काढला. पोलिसांनी प्रारंभी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
अज्ञात इसमाने अज्ञात करण्यासाठी या महिलेचा खून करून तिचा मृतदेह या पाण्यात टाकलेला आढळून आले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल केला आहे. या अज्ञात महिलेची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.
सदर महिलेच्या हातावर गोंदलेले असल्याचे आढळले. तिच्या हातावर निर्मला असे नाव आहे. सदर महिलेचा मृतदेह नग्नावस्थेत असल्याचे पोलिसांना आढळले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम