अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- शहरातील झेंडीगेट परिसरात प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉक्टर दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाकडून गोमास विक्री ठिकाणावर छापा टाकला आहे.
या छाप्यात दोघांना अटक केली असून साधनांचा 41 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नावेद सादिक कुरेशी, मोसिन सादिक कुरेशी अशी ताब्यात घेतलेले यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोतवाली ठाणे हद्दीतील झेंडीगेट भागात गोहत्या करून गोमास विक्री होत असल्याची गोपनीय माहिती प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांना मिळाली होती.
डॉ. राठोड यांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांच्या विशेष पोलीस पथकाने झेंडीगेट परिसरातील गोमांस विक्री ठिकाणी छापे टाकले.
यावेळी दोघांना ताब्यात घेऊन 280 किलो गोमांस व अन्य साहित्य असा 41 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघा कुरेशीवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved