स्व. कोल्हे, काळेंनी सहकारी संस्था निवडणूका बिनविरोधचा पायंडा पडला – बिपीन कोल्हे

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : सर्वसामान्यांना आर्थिक आधार व ग्रामीण भागाच्या विकासात मोलाचे सहकार्य देणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या, पतसंस्था, बँका, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, या सहकारी संस्था टिकाव्यात,

यासाठी स्व. शंकरराव कोल्हे व स्व. शंकरराव काळे यांनी सातत्याने या संस्थांच्या निवडणूका या संस्थांच्या निवडणूका बिनविरोध करण्याचा पायंडा ‘पाडल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.

काल मंगळवारी (दि. १३) येथील फेडरेशनच्या संचालकांच्या गौरवप्रसंगी ते बोलत होते. पतसंस्था फेडरेशनसाठी सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे नवे अध्यक्ष राजेंद्र निवृत्ती कोळपे तर उपाध्यक्ष ज्ञानदेव दगू मांजरे हे झाले.

यावेळी फेडरेशनचे संचालक डॉ. गुलाबराव वरकड, दादासाहेब औताडे, राजेंद्र देशमुख, रंगनाथ लोंढे, आशुतोष पटवर्धन, हेमंत गिरमे, संतोष गायकवाड, चित्रा वडनेरे तसेच शिवाजी वक्ते, केशव भवर, अंबादास देवकर, रामदास शिंदे, सतीश नीळकंठ, अतुल देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी बिपीन कोल्हे म्हणाले, नगर जिल्ह्याला व कोपरगाव तालुक्याला सहकाराची मोठी परंपरा आहे. माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकार क्षेत्रात मोठे योगदान दिले असून,

त्यांनी शेतकऱ्यांच्या वच सर्वसामान्य माणसांच्या आर्थिक उन्नतीसाठी अनेक सहकारी संस्थांची स्थापना करून त्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपल्या, नावारूपाला आणल्या.

सहकारी संस्था चांगल्या प्रकारे चालण्यासाठी त्यांनी नेहमीच पाठबळ दिले. त्यांचा आदर्श घेऊन आपण गेल्या ४० वषांपासून सहकार क्षेत्रात काम करीत आहे.

यावेळी काका कोयटे म्हणाले, स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकारी संस्थांना नेहमीच ‘पाठबळ देऊन सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी मोठे काम केले.

स्व. कोल्हे राज्याचे सहकारमंत्री असताना सर्वात जास्त पतसंस्थांना मंजुरी देण्याचे काम त्यांनी केले. सहकारी संस्थांच्या निवडणूका बिनविरोध करण्याची परंपरा आम्ही कायम ठेवली असल्याचेही कोयटे म्हणाले,

कोपरगाव तालुका पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक बिनविरोधकामी बिपीन कोल्हे, आ. आशुतोष काळे, विवेक कोल्हे, नितीन औताडे ब सर्व संचालक मंडळाचे सहकार्य मिळाले.

संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सतीश नीळकंठ यांनी १९ सभासदांना मतदानाचा हक्‍क परत मिळवून दिला. याकामी त्यांना राजेंद्र देशमुख यांनी मोलाची साथ दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe