अहिल्यानगर दक्षिण लोकसभा हा कृषी प्रधान क्षेत्र असलेला मतदारसंघ असून विविध तालुक्यांतील शेतकरी, फामर्स प्रोडयुसर कपंन्यांना अधुनिक कृषि सुविधांसह लॉजेस्टिक पार्कच्या पाठबळाची आवष्यकता असल्याने नगर दक्षिण मतदारसंघात लॉजेस्टिक पार्क उभारण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी उद्योग व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे गुरूवारी निवेदनाद्वारे केली.
गोयल यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमुद करण्यात आले आहे की, प्रमुख कृषि प्रधान क्षेत्र असलेल्या अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पारनेर, राहुरी, नगर, पाथड, शेवगांव, कर्जत, जामखेड आणि श्रीगोंदे या तालुक्यात मोठया प्रमाणावर शेती व्यवसाय करण्यात येतो.

आधुनिक कृषि सुविधांसह लॉजेस्टिक पार्क उभे राहिल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालासाठी योग्य बाजारभाव मिळू शकेल. वाहतूक व साठवणूकीच्या समस्या दूर होऊ शकतील.
निवेदनात पुढे नमुद करण्यात आले आहे की, अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लॉजेस्टिक पार्क उभारण्यासाठी आवष्यक जमीन उपलब्ध करण्यासाठी सबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्यासंदर्भात आदेश देण्यात यावेत.
ज्यामुळे या भागातील शेतकरी व शेती उत्पादनांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्याचा लाभ होईल. मतदारसंघातील कोणत्याही तालुक्यात शेतकऱ्यांची सुविधा लक्षात घेउन योग्य ठिकाणाची निवड करून हे लॉजेस्टिक पार्क उभारण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
शेती संबंधीत उत्पादने, पीके मोठया बाजारपेठेपर्यंत वेगाने पोहचविण्याची सुविधा उपलब्ध होईल. कोल्ड स्टोअरेज, प्रोसेसिंग युनिट आणि वेअरहाउस सारख्या सुविधा उपलब्ध होतील. फार्मर्स प्रोडयुसर कंपन्यांना आपले कृषि उत्पादन योग्य बाजारभाव मिळल्यानंतर विक्री करण्यास मदत होईल. रोजगाराच्या संधी उपलब्ध होउन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. या गोष्टींकडेही खा. लंके यांनी मंत्री गोयल यांचे लक्ष वेधले आहे.