अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar Crime:- भंगारचे दुकान फोडून सात जणांनी पत्र्याचे डबे, तांबे, पितळी तार, इतर सामान चोरून नेले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयश्री प्रकाश गायकवाड, जगन्नाथ संतु भिंगारदिवे, संगीता जगन्नाथ भिंगारदिवे, कुलदीप जगन्नाथ भिंगारदिवे, किरण सुमाम भिंगारदिवे, गोरख संतु भिंगारदिवे, नाथा अल्हाट (सर्व रा. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.
तमीम नसीर शेख (वय 26 रा. जीपीओ रोड, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा भंगार सामान खरेदी-विक्रीचा व्यावसाय आहे. सोमवारी दुपारी अडीच वाजता आरोपींनी फिर्यादी यांचे आठ हजार रूपचे किंमतीचे सामान चोरले.
फिर्यादी यांनी आरोपींकडे विचारणा केली असता संतु भिंगारदिवे याने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमोल आव्हाड हे करीत आहेत.