अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- सरकारने शहरी व ग्रामीण भागातील शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर जिल्ह्यात २ हजार प्राथमिक शाळा असून ,त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४० टक्के शाळा सुरू होण्याची शक्यता असून, पहिल्या दिवशी पाच हजारांच्या पुढे पहिल्या दिवशी विद्यार्थी येण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये काहीप्रमाणात शाळा सुरू झाल्या होत्या, त्यानंतर मात्र पुन्हा कोविड आल्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. कोरोनाची लाट कमी होऊन लागल्याने शुक्रवारी राज्य सरकारने शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची लसीकरण करणे आवश्यक असल्याची सूचना देण्यात आली आहे.
एकीकडे कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करावी असे स्पष्ट करण्यात आले असताना जिल्ह्यात मात्र ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत.
ग्रामीण भागातील अनेक गावांत आजही मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण असताना आठवडाभरात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. दरम्यान चार ऑक्टोबरपासून नगर जिल्ह्यातील ४० टक्के शाळा पहिल्या टप्प्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम