Ahmednagar News : एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा गावांच्या सर्वांगिण विकासाकरिता राजकारण विरहीत सर्वांनी एकत्र येवून सहकार्याची भूमिका ठेवल्यास गावांचा सर्वांगिण विकास होतो.
सत्ता असो अथवा नसो विखे पाटील परिवारावर जनता दाखवित असलेला विश्वास विकास कामातून आम्ही सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केले. संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजनेच्या आरंभप्रसंगी शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या.
यावेळी शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, ग्रामीण भागातील प्रत्येक माणसाला रोटी, जल और मकान मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना सुरु केल्या. ज्याचे अनुकरण करत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे विखे पाटील आपल्या प्रत्येक माणसाना या योजनेत सामील करुन घेत आहे.
जलजीवन योजना गावोगावी पोहचवून हर घर जल देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या योजनेतुन खऱ्या अर्थाने महिला समाधानी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी संदिप घुगे, अशोक तळेकर यांची भाषणे झाली. याप्रसंगी माजी उपसंरपच अशोक तळेकर,
राजेंद्र जाधव, रावसाहेब घुगे, भाऊसाहेब चव्हाण, नानासाहेब तळेकर, ग्रा.पं. सदस्य संजय जाधव, भारतराव शेवाळे, नाना उर्फ सुधाकर कदम, बाळासाहेब कदम, रंगन्नाथ मुंढे, नय्युम सय्यद, पुंजा पाटील नागरे, पांडूरंग सांगळे, अशोक सांगळे, नामदेव हजारे, दिपक जाधव, सुभाष पवार, रामभाऊ कदम, रामभाऊ घुगे आदी उपस्थित होते.