शेतकरी विकास समिती पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवणार

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : नालेगाव व नेप्ती, निंबळक शिवारामध्ये नॅशनल हायवे गेलेला असून हायवे जमिनीपासून १० ते १५ फूट उंच केलेला आहे. त्यामुळे तिन्ही गावातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये शेती करण्यासाठी रस्ता नाही. रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये जाण्यासाठी फार मोठी अडचण झालेली आहे.

शेतकरी संघटनांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषण केलेले असुन संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन चर्चा केलेली आहे. परंतु अधिकारी शेतकऱ्यांची अडचण समजून घेण्यास तयार नाही.

सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कमी पडत असून लोकशाही मार्गाने वेळोवेळी मागणी करूनही अधिकारी शेतकऱ्यांना पर्यायी रस्ता देण्यास तयार नाही त्या निषेधार्थ २६ ऑक्टोबर २०२३ रोजी भारताचे पंतप्रधान अहमदनगर येथील राहता तालुक्यामध्ये येणार असून त्यावेळेस गनिमी कावा करून काळ्याफिती लावून पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवणार असल्याचे अहमदनगर जिल्हा शेतकरी विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष विलास कराळे पाटील यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe