अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- नगर जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. गुलाबी थंडीतच सध्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे.
नुकतेच आगामी शिर्डी नगरपंचायत निवडणुकीसाठी सदस्य पदांचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान या सोडतीमध्ये जवळपास सर्वच ठिकाणी आरक्षणात बदल झाला आहे.

दरम्यान शिर्डी नगरपंचायतच्या सभागृहात शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर रोजी शिर्डी उपविभागीय कार्यालयाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर,
उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते तसेच नगरसेवक व नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत 17 प्रभागांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. दरम्यान या सोडतीवर 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी आहे.
प्रभागनिहाय सोडत पुढीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 3 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 4 सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक 5 नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 6 अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक 7 अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक 8 नागरिकांचा मागास प्रवर्ग,
प्रभाग क्रमांक 9 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10 नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 11 अनुसूचित जाती, प्रभाग क्रमांक 12 अनुसूचित जमाती, प्रभाग क्रमांक 13 सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्रमांक 14 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 15 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 16 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 17 सर्वसाधारण यानुसार आरक्षणाची सोडत निघाली आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













