अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagar News :- शिर्डी ते तिरुपती विमानसेवा २७ मार्चपासूनच सुरु होणार आहे. यापूर्वी ती २९ मार्चपासून सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत होतं.
मात्र, ही सेवा रविवारपासूनच नियमितपणे सुरू होत असल्याचं महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी जाहीर केलं आहे.
स्पाइज जेट या विमान कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. देशातील ही दोन महत्वाची देवस्थान विमानसेवेनं जोडली जाणार आहेत. तिरुपतीवरुन दुपारी दोन वाजता विमान निघेल, पावणेचार वाजता ते शिर्डी विमानतळावर येईल.
त्यानंतर सव्वा चार वाजता ते पुन्हा तिरूपतीसाठी उड्डाण घेईल. आंध्रप्रदेशातून शिर्डीत येणार्या भाविकांची तसंच आपल्या जिह्यातून तिरुपती बालाजीला जाणार्या भाविकांची यामुळं सोय होणार आहे.