प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शिर्डीकर आक्रोश मोर्चा काढणार…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- करोनाच्या संकटात साईसमाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने शिर्डीतील हॉटेल आणि लहानमोठे व्यवसाय संपूर्ण ठप्प होते. त्यामुळे शहरातील 50 हज़ार लोकांचा रोजगार बुडाला.

मात्र नागरपंचायत व्यावसायिकांकडून कर वसुली करत आहे. यामुळे व्यापारी वर्ग संतप्त झाला आहे. शिर्डीतील लहान-मोठ्या उद्योगांचे अर्थकारण पूर्णपणे थांबवले असल्याने

तातडीने करमाफी व गाळे भाडे माफ़ी द्यावी यासाठी शिर्डी शहरातील ग्रामस्थांच्यावतीने येत्या 25 फेब्रुवारी रोज़ी सकाळी 10 वाजता नगरपंचायत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आक्रोश मोर्चा काढणार असल्याचा

इशारा माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिला आहे. यावेळी कैलासबापू कोते व शिवाजी गोंदकर यांनी सांगितले की, विविध बँकांचा एनपीए पाचशे कोटीच्या पुढे गेला.

या पार्श्वभूमीवर शहरातील व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी नगरपंचायतीच्या सत्ताधारी पदाधिकार्‍यांनी आणि नगरसेवकांनी एकमताने मालमत्ताकर व गाळा भाडे माफीचा ठराव सभागृहात मंजूर केला.

राज्य सरकारनेही या ठरावाची गंभीर दखल घेऊन नगरपंचायतीने आपल्या स्तरावर निर्णय घेण्याचे आदेश दिले असतानाही नगरपंचायत प्रशासनाने शहरातील 9 हज़ार मालमत्ताधारकांना व गाळे धारकांना मालमत्ता कराच्या वसुलीसाठी नोटिसा धाडल्या आहे.

नगरपंचायत प्रशासनाची ही कृती निंदनीय आहे. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतच्या प्रशासनाला याच प्रश्नावर जाब विचारण्यासाठी नगरपंचायतीसमोर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

मालमत्ता करमाफीच्या केलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी व जप्ती नोटिसा मागे घ्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe