Shirdi News : शिर्डीच्या अर्थकारणाला मिळणार गती ! रोजगार निर्मितीसह धार्मिक पर्यटनाला चालना

Ahmednagarlive24 office
Published:
Shirdi News

Shirdi News : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाच्या एका वर्षाच्या काळातच शिडीं शहराच्या आणि नगर जिल्ह्याच्या विकासासाठी क्रांतिकारी निर्णय घेतल्याने आगामी काळात रोजगार निर्मितीसह धार्मिक पर्यटनाला मोठी गती येवून शिर्डीसह नगर जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना मिळणार असल्याचे शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

याबाबत दिलेल्या पत्रकात कोते यांनी म्हटले आहे की, अंतरराष्ट्रीय किर्ती असलेल्या शिर्डी शहर आणि परिसराच्या विकासासाठी एमआयडीसी, पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिर्डी एअरपोर्ट विकासासाठी ६०० कोटीच्या निधीला मान्यता, शिर्डीत भाविकांसाठी गार्डन प्रकल्प, ८० कोटीचे, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आदी प्रकल्पांना मान्यता मिळाली.

त्यामुळे शिर्डी शहर आणि परिसरात नवीन आर्थिक क्रांतीचे पर्व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरू केले असून त्याचा फायदा राहाता तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील शेतकरी, व्यावसायिकांबरोबरच तरूणांच्या रोजगार वृद्धीसाठी होणार आहे.

शिर्डी शहराच्या विकासाला आजवर महसूलमंत्री विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरात विकासकामे मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यांच्याच प्रयत्नातून साई संस्थानकडून यापूर्वी शिर्डी शहरात पायाभूत सुविधा आणि विकासासाठी मोठा निधी उपलब्ध झाल्याने शिर्डी शहराचा चेहरा-मोहरा बदलून गेला आहे.

शिर्डी शहराच्या विकासाबरोबरच नगर जिल्ह्याच्या खोळंबलेल्या विकासाला गती मिळाली आहे. निळवंडे प्रकल्पाचा फायदा जिरायत भागासाठी होणार आहे. तसेच नगर शहराच्या विकासाचा मार्ग खुला करण्यासाठी विळद परिसरात एमआयडीसी ला मान्यता आली आहे.

महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय या विभागांमार्फत गेल्या वर्षभरात महत्वाच्या घेतलेल्या निर्णयाचा लाभ राज्यातील लाखों लोकांना मंत्री विखे पाटील मिळवून दिला आहे. शिर्डी नजीक सावळीविहीर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि राज्यातील पहिले पशु विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय शेतकरी हितासाठी उपयुक्त ठरणार आहे. दूध उत्पादकांना ३४ रूपये भाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूलमंत्री विखे पाटील यांनी घेतला आहे.

जिल्ह्याचा विकास आराखडा करताना रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्टे मंत्री विखे पाटील यांचे आहे. शेती महामंडळाच्या जमिनीचा लोकहीतासाठी व्हावा, यासाठी शिर्डीत औद्योगिक वसाहत करण्याचा निर्णय शिर्डीच्या विकासासाठी महत्वाचा ठरणारा आहे, असे कैलासबापू कोते यांनी सांगितले.

महसुल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यावसाय विकास या विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांतर्गत माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवून जास्तीत जास्त गरजू नागरीकांना योजनेचा लाभ मिळवा, यासाठी राज्य सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. नगर जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन त्यासाठी ४५ कोटी निधी मंजूरी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe