अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- कमी श्रमात जास्त नफा मिळवून देणारा सावकारी धंदा असुन कोपरगाव तालुक्यात खाजगी सावकारी सुरु आहे.या खाजगी अवैद्य सावकारीतुन अव्याच्या सव्वा दराने व्याज वसुल केले जात आहे.
या सावकारशाहीच्या राक्षसी प्रथेवर कायदा असुनही तो कागदावरच दिसत आहे.ग्रामीण शहरी भागातील मजुर गोरगरीब त्याच बरोबर शेतकरी यांना प्रंचड व्याजाने कर्ज देवुन नंतर त्यांची मालमत्ता हडप करण्याची संस्कृती निर्माण होत आहे.राज्यात या खाजगी सावकारीला कंटाळुन अनेकांनी आत्महत्या देखील केल्या आहेत.
अवैद्य सावकारीला चाप लावण्यासाठी नागरिकांनी पुढे येवुन पोलिस स्टेशनला तक्रारी कराव्यात कारण या खाजगी सावकारीच्या तावडीत सापडलेल्या अनेक नागरिकांचे कुटुंब उध्दवस्त झाले आहे.खाजगी सावकार गरजु नागरिकांना मोठ्या व्याजाने कर्ज देतात.या व्याजाचा दर दरमहा ८ ते २० टक्कांपर्यत असतो.
नागरिकांनी कर्ज वेळेवर फेडले नाही तर मोठी रक्कम व्याजाने होते.अशा वेळी खाजगी सावकार गुंडगिरीवर येतात.त्यामुळे भांडणे होतात.आणि सामान्य माणसाला प्रंचड मनस्ताप होतो.कधी कधी आत्महत्येचा देखील विचार अशा सावकारीला बळी पडलेल्या व्यक्तींना येतो. व्यापारीही या खाजगी सावकारीला बळी पडले आहे.
खाजगी सावकारीला कायद्याचा धाक राहिला नाही.काही प्रकरणात नागरिकांना जबर मारहाण झाली आहे.दमदाटीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.कर्जवसुली साठी तगादा लावला जातो.घरी चक्करा मारून महिलांनाही त्रास दिला जातो.काही व्यापारी अक्षरक्षा गाव सोडून गेले आहे.काही नागरिक व्यापारी यांना धमक्या दिल्या जातात.
त्यामुळे भीतीपोटी कोणी पुढे येत नाही. अशा खाजगी सावकारीला बळी पडलेल्या नागरिकांनी पोलिस स्टेशनला न घाबरता तक्रारी कराव्या.खाजगी सावकारीच्या धमक्यांना न जुमानता पुढे यावे किंवा कोपरगाव शहर शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा अशा गुंडगिरीच्या खाजगी सावकारांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल.
आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातुन अशा जाचक त्रासापासुन मुक्त करण्यास मदत करेल असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात शिवसेना शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी म्हटले आहे.संपर्कासाठी त्यांनी आपला 70202 74200 मोबाईल क्रमाक दिला असुन नागरिकांनी न घाबरता पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम