भर उन्हाळ्यात महावितरणच्या शॉक ट्रीटमेंटमुळे संताप, दिवस-रात्र वीज गायब

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : महावितरणच्या मनमानी कारभाराला चितळी ग्रामस्थ त्रस्त झाले असून रोजच रात्री व दिवसा गावठाण भागासह, वाड्या वस्त्यावर वीज गायब असल्याने भर उन्हाळ्यात महावितरणच्या शॉक ट्रीटमेंट मुळे संताप व्यक्त होत आहे.

गेल्या महिनाभरापासून चितळी येथे शेतीच्या व घरघुती विजेचा खेळखंडोबा झाला आहे. कधी भारनियमन तर कधी दुरुस्ती तर कधी रात्र-रात्र बत्ती गुल होत असल्याने घामाच्या धारा निघत आहे.

बहुतेक वेळा मान्सून हंगाम आला की वीज गायब असते, परंतु मान्सून उंबरठ्यावर असतानाच सध्या महावितरणच्या ढिसाळ कामामुळे घरगुती वीज ग्राहक चागंलेच त्रस्त झाले आहे.

मान्सूनपूर्व कामे अपूर्ण..!

पावसाळ्यात विजेशी निगडित तारा ओढणे, अडसर असणारे झाडे, फांद्या, झुकलेले पोल यांची कामे केल्यास वीज पुरवठा खंडित होत नाही. परंतु गावात व बहुतेक वाड्या- वस्त्यांवर पावसाळा आला तरी ही कामे तशीच असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.

चिमुकल्याचे हाल..!

खंडित वीज पुरवठा मुळे व उन्हाचा तडाखा असल्याने रात्री व दिवसा बहुतेक वेळा वीज गायब असते. विशेषत घरातील जेष्ठ नागरीक, लहान मुले व आजारी व्यक्तींना होत असल्याने महावितरणच्या या मनमानी कारभारा विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पिण्याच्या पाण्याचे हाल !

येथील पाणी पुरवठा प्रकल्प वरील वीज आठ-दहा तास गायब असल्याने पाणी पुरवठा प्रकल्प बंद पडतो. परिणामी पाण्याचे शुद्धीकरण होत नाही. त्यामुळे गावात पाणी पुरवठा करण्यास अडसर येत असून त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe