अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- पसार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावर सात जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील कारगाव चौकात घडली आहे.
या हल्ल्यात नगर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी भरत बाजीराव धुमाळ हे जखमी झाले असून त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, हवालदार धुमाळ हे पसार आरोपी रमेश भोसले याला अटक करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे असलेल्या सात जणांनी धुमाळ यांना पकडून लाकडी दांडके, दगड,
लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. धुमाळ यांच्या दुचाकीचे नुकसान केले आहे. याप्रकरणी जखमी धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हल्ला करणारे रमेश सावत्या भोसले, तुषार सावत्या भोसले,
आत्मशा सावत्या भोसले, सावत्या भोसले, अविनाश ऊर्फ सुरशा भोसले, शेरीना रमेश भोसले व एक अनोळखी (सर्व रा. पिंपळगाव कौंडा ता. नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम